चर्चा यशस्वी.. अण्णा हजारेंचं उपोषणाचं हत्यार म्यान 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तब्बल सात दिवस उपोषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राळेगण सिद्धीत येण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांना तब्बल सहा तास चर्चा करायला भाग पाडल्यानंतरच उपोषण मागे घेण्यास मान्यता दिली.

केंद्रामध्ये लोकपाल, राज्यात लोकायुक्त नेमण्यासाठी अण्णांचा आग्रह होता.  तसेच शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीची त्यांची मागणी होती. कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याचे अण्णांचे मत होते.

या साऱ्या विषयांवर अण्णांचे मन वळविण्यासाठी आणि त्यांचे उपोषण लवकर संपविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन  हे आधीपासून प्रयत्न करत होते. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील अण्णांशी चर्चा करण्यासाठी काल आले होते.  मात्र त्यातून मार्ग निघण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना यावे लागले. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनाही अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीहून आज दुपारी यावे लागले.

ही सारे मंडळी आज दुपारी दोनच्या सुमारास अण्णांसोबत बंद खोलीत चर्चेला बसली. चर्चा एक-दीड तासांत संपून अण्णांचे उपोषण संपेल, असा अंदाज होता. सरकार हे अण्णांना नेहमीप्रमाणे गुंडाळेल, अशीही शंका व्यक्त होत होती. मात्र अण्णांनी मुख्यमंत्र्यांना सहा तास चर्चा करण्यास भाग पाडले. 

अण्णांच्या वतीने पोपटराव पवार, सोमपालशास्त्री ही मंडळी बाजू मांडत होती. शेतकऱ्यांना सहा हजार रूपये वार्षिक मदत देण्याचा सरकारचा जो निर्णय आहे त्या रकमेत वाढ करण्याची अण्णांची मागणी होती. त्यावर सरकारची आर्थिक स्थिती सुधार झाल्यानंतर ही रक्कम वाढविण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आले. 

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करायची, या चर्चेत बराच वेळ गेल्याचे सांगण्यात आले. अण्णांनी आधीच पूर्ण तयारी करून सरकार आपल्याला गुंडाळणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यास भाग पाडले

संबंधित बातम्या

Saam TV Live