खडकवासल्यातून सोडला वर्षभराचा पाणीसाठा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

खडकवासला : यंदाचा पाऊस सुरू होऊन सुमारे 70 दिवस झाले. पावसाचा जोर कायम राहिल्याने कमी दिवसात धरण 100 टक्के भरली. परिणामी खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चार ही धरणे पुन्हा भरतील एवढे पाणी मुठा नदी आणि कालव्यातून सोडावे लागले. म्हणजे धरणातील वर्षभराचा पाणीसाठा सोडला.

खडकवासला : यंदाचा पाऊस सुरू होऊन सुमारे 70 दिवस झाले. पावसाचा जोर कायम राहिल्याने कमी दिवसात धरण 100 टक्के भरली. परिणामी खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चार ही धरणे पुन्हा भरतील एवढे पाणी मुठा नदी आणि कालव्यातून सोडावे लागले. म्हणजे धरणातील वर्षभराचा पाणीसाठा सोडला.

पाटबंधारे विभागाचे पावसाचे नवीन वर्ष दरवर्षी एक जून रोजी सुरू होते. तर धरणातील पाणी वाटपाचे नवीन वर्ष एक जुलै पासून सुरू होत असते. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चार ही धरणात सर्वात कमी पाणीसाठा 28 जून 2019 रोजी होता. या दिवशी चार ही धरणात म्हणून 2.20 टीएमसी म्हणजे 7.54टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 10 जुलै रोजी खडकवासला धरण भरल्यानंतर या धरणातून कालवा आणि नदीतून निसर्ग सोडण्यास सुरुवात केली. पानशेत धरण दोन ऑगस्ट रोजी, वरसगाव धरण 4 ऑगस्टला व टेमघर धरण 5 ऑगस्ट रोजी रात्री 100 भरले. यंदा जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने ही पानशेत, वरसगाव व टेमघर लागोपाठ शंभर टक्के झाली. दरम्यान, प्रत्येक धरण 100 टक्के भरल्यानंतर या धरणातून विसर्ग सोडावा लागला. तो विसर्ग खडकवासला धरणात जमा होत असल्याने या धरणातून 

मुठा नदीत सोडण्यात येत होता. या नदीत सोडलेला विसर्ग पुढे उजनी धरणात मिळतो. त्यामुळे ते पाणी वाया जात नाही. खडकवासला धरणातून यंदा उच्चांकी 45 हजार 474 क्यूसेक विसर्ग दोन वेळा सोडावा लागला. तर 2016 साली 41 हजार 756 विसर्ग सोडावा लागला. तर मागील दहा वर्षात 2011साली 67 हजार 212 सर्वाधिक विसर्ग सोडला होता 

दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीत आज रविवार अखेर सुमारे 25 टीएमसी पाणी सोडले. तर कालव्यातून सुमारे तीन टीएमसी पाणी दौड, इंदापूर, बारामती व हवेली तालुक्यातील शेती आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे.

WebTitle : marathi news annual quota of water released from khadakwasala dam

 


संबंधित बातम्या

Saam TV Live