चीनमध्ये आणखी एका भयानक व्हायरसचा जन्म, लक्षणंच दिसत नसल्यानं रुग्ण ओळखण्याचं आव्हान

साम टीव्ही न्यूज
रविवार, 12 एप्रिल 2020
  • एसिम्टोमॅटिक म्हणजेच लक्षण नसलेला कोरोना-रुग्ण
  • कोरोनाच्या या प्रकाराची लक्षणंच रुग्णामध्ये दिसत नाहीत
  • कोरोनाची लक्षणंच न दिसल्यामुळे प्रसाराचा वेग जास्त
  • चीनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची 50 हून अधिक जणांना बाधा

चीनमध्ये कोरोनानंतर आणखी एक व्हायरसनं धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय, हा व्हायरस कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक आहे. 

कोरोनाचं आव्हान अवघ्या जगासमोर आ वासून उभं असताना आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसनं जन्म घेतलाय. कोरोना ज्या वुहान शहरात जन्मला आणि साऱ्या जगभरात पसरला त्याच शहरात कोरोनापेक्षाही आणखी खतरनाक व्हायरसचा जन्म झालाय. या नव्या व्हायरसला एसि-म्टो-मॅटिक असं नाव देण्यात आलंय, कोरोनापेक्षाही हा भयानक व्हायरस असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

चीनमध्ये नवा व्हायरस 

  • एसिम्टोमॅटिक म्हणजेच लक्षण नसलेला कोरोना-रुग्ण
  • कोरोनाच्या या प्रकाराची लक्षणंच रुग्णामध्ये दिसत नाहीत
  • कोरोनाची लक्षणंच न दिसल्यामुळे प्रसाराचा वेग जास्त
  • चीनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची 50 हून अधिक जणांना बाधा

हा व्हायरस सध्या हुबेई प्रांतापुरताच मर्यादित असला तरी या व्हायरसची लक्षणंच दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण ओळखायचा कसा आणि व्हायरसला रोखायचं कसं हा प्रश्न आहे. कोरोनातून चीन सावरत असताना आता एसिम्टोमॅटीक व्हायरस अर्थात नव्या घातक कोरोनाचं आव्हान चीनसमोर उभं ठाकलंय.

Web Title - Another terrible virus in China

संबंधित बातम्या

Saam TV Live