बंदूक हाती घ्याल, तर ठार मारले जाल; दहशतवाद्यांना लष्कराचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जम्मू : काश्मीरमध्ये दहशतवादी मार्गाला लागलेल्या मुलांना समजाविण्याची महत्त्वाची भूमिका त्यांच्या मातांनी निभवायला हवी. त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. तरीही बंदुक हातात घेणाऱ्या तरुणांना सोडणार नाही, असा इशारा लष्कराचे लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन यांनी सांगितले.

जम्मू : काश्मीरमध्ये दहशतवादी मार्गाला लागलेल्या मुलांना समजाविण्याची महत्त्वाची भूमिका त्यांच्या मातांनी निभवायला हवी. त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. तरीही बंदुक हातात घेणाऱ्या तरुणांना सोडणार नाही, असा इशारा लष्कराचे लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन यांनी सांगितले.

पुलवामा हल्ल्याचा घाव बसलेल्या भारतीय जवानांनी सोमवारी या हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशिद गाझी ऊर्फ कामरान याला चकमकीत ठार केले. पुलवामामध्येच झालेल्या या चकमकीत लष्करातील एका मेजरसह चार जवानांनाही हौतात्म्य आले. तसेच, या वेळी आणखी एक दहशतवादी मारला गेला, तर एक नागरिकाचाही गोळ्या लागून मृत्यू झाला. यानंतर आज लष्कर-सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

धिल्लन म्हणाले, की काश्मिरमध्ये जे बंदूक हातात घेतील त्यांची गय केली जाणार नाही. पुलवामा येथे सोमवारी झालेल्या चकमकीत आम्ही तीन दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. 100 तासांच्या आत लष्कराने पुलवामा स्फोटाच्या सुत्रधाराला ठार मारले. जैशे महंमदच्या म्होरक्या लपल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली. आम्हाला आनंद आहे की आम्ही त्याचा खातमा केला आहे. काश्मिरमधील मातांना माझी विनंती आहे, की त्यांनी त्यांच्या मुलांना दहशतवादाचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्यासाठी सांगावे. त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, सरकारच्या योजना आहेत. ज्यांनी बंदुका हातात घेतल्या आहेत, त्यांचा खातमा निश्चित आहे. आम्ही सर्व सुरक्षा दले मिळून काश्मिरमध्ये काम करत आहेत. 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहतो.

WebTitle : marathi news anyone who picked up the will be eliminated indian army warns terrorist forces


संबंधित बातम्या

Saam TV Live