चीनमधून ऍपल कंपनी बस्तान हलवणार, ऍपल भारतात उघडणार 6 प्लांट

साम टीव्ही
रविवार, 2 ऑगस्ट 2020
  • चीनमधून आणखी एक मोठी कंपनी बस्तान हलवणार
  • अॅपल भारतात उघडणार 6 प्लांट
  • 55 हजार लोकांना मिळणार रोजगार

कोरोनानंतर अनेक कंपन्या चीनमधून आपलं बस्तान हलवतायंत. आता त्यात अॅपलचीही भर पडलीय. चीनला राम राम ठोकत अॅपलचे 6 प्लांट भारतात येणार आहेत.

चीनमधनं जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीनं आपलं बस्तान हलवलंय. एका रिपोर्टनुसार जगातला सर्वात महागडा ब्रँड अॅपलच्या एका निर्मात्यानं 6 प्लांट चीनमधनं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हे 6ही प्लांट भारतात शिफ्ट करण्यात येणार आहेत. 5 अरब डॉलरचे आयफोन या प्लांटच्या माध्यमातून निर्यात होणार आहे. दुसरीकडे 55 हजार भारतीयांना रोजगार मिळण्याचीही शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅपलचा हा निर्माता भारतात आयफोनसह टॅबलेट, लॅपटॉप आणि कंप्युटरचीही निर्मिती करण्याचा विचार करतोय. या प्लांटसंबंधी पहिला कंटेनर भारतात पोहचल्याचीही माहिती मिळतेय. अॅपलसह 22 कंपन्या चीन सोडून भारतात येण्यास उत्सुक आहेत. यात सॅमसंगसारख्या बड्या कंपनीचाही समावेश आहे.

एप्पल आणि सॅमसंग या दोन्ही ब्रँडचा ग्लोबल मोबाईल मार्केटमध्ये ६० टक्के हिस्सा आहे. ११ हजार कोटींची गुंतवणूक भारतात करण्यास या कंपनी तयार आहेत. या दोन्ही कंपन्यांना भारतानं रेड कार्पेट अंथरलं तर भारत जागतिक मोबाईल निर्यातीचं केंद्र बनेल हे नक्की
 


संबंधित बातम्या

Saam TV Live