'जेएनयू'मध्ये प्रवेशाची युवकांमध्ये मोठी 'क्रेझ'...अर्ज प्रक्रिया सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 मार्च 2020

नाशिक : देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रवेशाची सध्या युवकांमध्ये मोठी "क्रेझ' आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या युगात बौद्धिक क्षमतेला आव्हान देणाऱ्या आणि त्याद्वारे उज्ज्वल भवितव्याची कवाडे उघडणाऱ्या या विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)मार्फत 11 ते 14 मे दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये जेएनयूईई-2020 ही प्रवेश परीक्षा होणार आहे.

परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करणे सक्‍तीचे

या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूटसह विविध विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी एनटीएमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते. याअंतर्गत जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (जेएनयू)मध्ये प्रवेशासाठीदेखील परीक्षा होणार आहे. यात पीएच.डी., एम.फिल., एम.टेक., एम.ए., एम.एस्सी., एमसीए, बीए (ऑनर्स), बी.एस्सी., एम.एस्सी. यांसह अन्य अर्धवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करणे सक्‍तीचे असून, त्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत आहे. याच मुदतीत निर्धारित शुल्क ऑनलाइन स्वरूपात अदा करावे लागणार आहे. यानंतर अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्तीसाठी 7 ते 15 एप्रिलपर्यंत मुदत असेल. 

हे ही वाचा - अजितदादा डरकले : नीट रहायचं. माझी सटकली तर काय खरं नाय 

दोन सत्रांमध्ये परीक्षा 

देशभरातील परीक्षा केंद्रांवर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) या स्वरूपात 11 ते 14 मेदरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल. सकाळच्या सत्रात साडेनऊ ते साडेबारा, तर दुपारच्या सत्रात अडीच ते साडेपाच या वेळेत ही परीक्षा होईल. प्रवेश परीक्षेद्वारे 70 टक्‍के, तर उर्वरित 30 टक्‍के मूल्यांकन मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर अंतिम गुणवत्तायादी तयार केली जाणार आहे. 

राज्यात आठ शहरांमध्ये परीक्षा 

देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही जेएनयूईई 2020 प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना चार शहरांतील परीक्षा केंद्रांचे पर्याय नोंदवावे लागणार आहेत. यापैकी उपलब्धता व प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वानुसार परीक्षा केंद्रांची निश्‍चिती केली जाईल. राज्यात नाशिकसह पुणे, मुंबई, नवी मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, ठाणे अशा आठ शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.  

Web Title Application Process For Admission To JNU Started 

संबंधित बातम्या

Saam TV Live