12वी परिक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

आधी हा कालावधी ३ ऑक्‍टोबर ते २३ ऑक्‍टोबर असा होता. आता बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे विद्यार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी या सर्वांना १५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत अशी मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरताना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक अडचणी येत असल्याने मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Applications for the extension of the HSC exam

संबंधित बातम्या

Saam TV Live