दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱयांवर योग्य वेळीआणि योग्य ठिकाणी कारवाई केली जाईल- अजित दोवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान देश विसरला नाही आणि विसरू देणार नाही. दहशतवाद्यांविरोधात व त्यांना पाठिंबा देणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी पाकिस्तानला आज (मंगळवार) दिला.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 80व्या वर्धापनदिनानिमित्त हरयाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात अजित दोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी बोलताना दोवाल म्हणाले, 'देश पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 40 जवानांचे शौर्य कधीही विसरणार नाही अथवा विसरू देणार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱयांवर योग्य वेळी व योग्य ठिकाणी कारवाई केली जाईल. देशासाठी सीआरपीएफचे योगदान महत्वाचे आहे. अंतर्गत सुरक्षा महत्वाची असते. दुसऱ्या जागतीक युद्धानंतर 37 देश असे होते जे उद्धवस्त झाले आणि आपले सार्वभौमत्व गमावून बसले. यामधील 28 देशांचे कारण त्यांचा देशांतर्गत संघर्ष हे होते. देश दुबळा असतो कारण त्याची अंतर्गत सुरक्षेत कमजोर असते, त्यामुळे याची जबाबदारी सीआरपीएफवर येते. कदाचित लोक विसरले असतील की, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर खूपच कमी संख्या असतानाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्वाची भुमिका निभावली त्यावर एक पुस्तक लिहीले जाऊ शकेल.''सीआरपीएफच्या गणवेशाशी आणि भारताच्या सुरक्षेशी मी 81 वर्षांपासून जोडलो गेलो आहे. यांपैकी 37 वर्षे मी पोलिस खात्याचा भाग होतो. मला लष्कर आणि पोलिसांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, आपल्या बलाचे काही वैशिष्ट्ये आहेत. हेच एक बल आहे ज्यामध्ये इतकी विविधता आहे. व्हीआयपी सुरक्षा, दहशतवाद, कठीण भागात कर्तव्य बजावणे तसेच ईशान्य भारताच्या आव्हानांसह ज्या-ज्या ठिकाणी गरज पडली तिथे

सीआरपीएफने महत्वाचे योगदान दिले आहे,' असेही दोवाल म्हणाले.

Web Title: more action will be taken against Pakistan says Ajit Doval

संबंधित बातम्या

Saam TV Live