अरबाजच 'बेटिंग राजा'

विकास काटे
शनिवार, 2 जून 2018

अभिनेता अरबाज खान बेटिंगच्या जाळ्यात पुरता अडकलाय. सोनू जालानच्या माहितीवरून जेव्हा ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकानं अरबाजची चौकशी केली त्यात धक्कादायक माहिती समोर आली. अरबाज खान गेल्या पाच वर्षांपासून सोनू जालानला ओळखतो. गेल्या आयपीएलच्या मोसमात अरबाज 2 कोटी 75 लाख रुपये हरल्याची कबुलीही त्यानं दिलीय. एवढंच नाही. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वैवाहिक आयुष्यातही बेटिंगमुळं खटके उडाल्याची माहिती समोर आलीय.

बेटिंगमध्ये अनेक सिनेनिर्मातेही अडकण्याची शक्यता आहे. बेटिंगचे सगळे पुरावे देण्यास अरबाज तयार झाल्यानं त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. चार तासांच्या चौकशीनंतर अरबाजला घरी जाण्याची परवानगी देण्यात आलीय. सलमान खानचं हिट अँड रन आणि चिंकारा शिकार प्रकरण यामुळं सरकारची डोकेदुखी कायम होती. आता अरबाजच्या बेटिंग प्रकरणामुळे ही डोकेदुखी आणखी वाढलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live