अर्जुन रामपाल, मेहेर 20 वर्षांनंतर होणार विभक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 मे 2018

मुंबई : बॉलिवूडच्या कलाकारांची लग्ने आणि घटस्फोट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. हिमेश रेशमिया-कोमल, अरबाज खान-मलायका, संजय कपूर- करिष्मा यांच्या धक्कादायक घटस्फोटानंतर आता बॉलीवूडची 'आदर्श जोडी' म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहेर जेस्सिया रामपाल यांनी 20 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

1998 मध्ये ती दोघे लग्नबंधनात अडकली होती. त्यांना माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जरी आम्ही विभक्त होत असलो तरी आम्ही नेहमीच एकमेकांसोबत असू आणि आमचे एकमेकांवरील प्रेम असेच कायम राहील. प्रेम आणि आठवणींचा हा 20 वर्षाचा सुंदर प्रवास होता. प्रत्येक प्रवासाला वेगवेगळी मार्ग असतात. त्यामुळे आम्हाला वाटते, एकमेकांपासून वेगळे होऊन नवीन प्रवासाची सुरुवात करण्याची हीच ती वेळ आहे. परंतु नाती संपली म्हणुन प्रेम संपत नाही. या पूर्वीही एखाद्या निर्णयात आम्ही दोघे खंबीरपणे उभे राहायचो. यानंतरही आमच्यासाठी आणि आमच्या प्रियजनांसाठी आम्ही नेहमीच एकत्र असू. आम्ही एक कुटुंब आहोत, वेगऴे झालो तरी आमचे एकमेकांप्रती असणारे प्रेम अखंड राहिल व आमच्या मुलींसाठी आम्ही नेहमीच एकत्र येऊ. आम्ही दोघेही आमचे खाजगी आयुष्य खूप जपतो, परंतु सत्य हे चुकीच्या पद्धतीने समोर येऊ नये म्हणून वेगळे होण्याचा हा निर्णय जाहीर सांगण्यास उशीर झाला.

ऋतिक रोशन-सूझान खान घटस्फोट प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. तेव्हाच अर्जुन रामपाल आणि मेहेर जेस्सिया यांच्या विभक्त होण्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होती. त्यादरम्यान अर्जुनने आशिम अहुलिवालिया दिग्दर्शित 'डॅडी' हा चित्रपट केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live