तेव्हा खोतकरांकडून तोंडघशी पडलेल्या सत्तारांनी आता असा घेतला बदला

सरकारनामा
शनिवार, 4 जानेवारी 2020

औरंगाबाद:  अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना अपयश आले आहे.  यावर तेव्हा  खोतकर यांनी ऐकले नाही. आता सत्तार यांनी त्यांना नकारघंटा दिली असेच म्हणावे लागेल .

औरंगाबाद:  अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना अपयश आले आहे.  यावर तेव्हा  खोतकर यांनी ऐकले नाही. आता सत्तार यांनी त्यांना नकारघंटा दिली असेच म्हणावे लागेल .

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्जुन खोतकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे करण्याचे प्रयत्न तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या अब्दुल सत्तार यांनी केले होते. जालना जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात दानवे विरुद्ध खोतकर या संघर्षाचा फायदा उचलत रावसाहेब दानवे यांना चकवा देण्याची तयारी तेव्हा सत्तार यांनी केली होती. सुरुवातीला शिवसेनेत नाराज असलेल्या खोतकर यांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता .

दरम्यानच्या काळात खोतकर -सत्तार यांच्या गुप्त बैठका, एकमेकांच्या भेटीगाठी याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. खोतकर गळाला लागले असे गृहीत धरून सत्तार यांनी तेव्हा जोरदार मोर्चेबांधणी केली होती . मात्र लोकसभा निवडणूक महायुती एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांचे बंड मोडून काढले होते .

रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या विरोधातच मित्रपक्षाच्या आमदाराने बंद करणे युतीसाठी घातक ठरू शकते, म्हणून खोतकर यांना माघार घेण्यास नेत्यांनी तेव्हा भाग पडले होते. सहाजिकच त्यामुळे अब्दुल सत्तार तोंडघशी पडले, आणि दानवे यांना शह देण्याचा त्यांचा प्रयत्न खोतकर यांच्या माघारी मुळे फसला. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तार यांनी बाहेर काढलेले राजीनामा अस्त्र त्यांना म्यान करायला लावण्यासाठी खोतकर यांवर सोपवलेली जबाबदारी त्यांना पार पाडता आली नाही. त्यामुळे तेव्हा खोतकरांनी ऐकले नाही, आता सत्तारांनी त्याची परतफेड केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live