हनी ट्रॅप'मध्ये अडकला जवान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवानाला पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकविण्यात आले होते. यादरम्यान या जवानाने लष्करातील गोपनीय माहिती उघड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्तचर संस्था (IB), मिलिट्री इंटेलिजेंस आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जात असून, संबंधित जवानाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित जवान मध्य प्रदेशातील महू येथील इन्फँट्री बटालियन येथे लेखनिक पदावर कार्यरत आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी त्याला पाकिस्तानला माहिती पुरवत असताना पकडले. या जवानाला गोपनीय माहिती देण्यासाठी 'हनी ट्रॅप'मध्ये फसविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी या जवानाचा मोबाईल आणि अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, या जवानाचा मोबाईल जप्त करण्यात आल्याने यातून महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.  

Web Title: Army personal Honey Trapped given secret information to Pakistan

संबंधित बातम्या

Saam TV Live