आर्टिकल १५ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे
गुरुवार, 27 जून 2019
  • आर्टिकल १५ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
  • करणी सेनेसह, ब्राह्मण महासंघाचा विरोध
  • ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा आरोप

बॉलीवूड आणि वाद हे नातं तसं जुनंच. आता यात आणखी एका सिनेमाची भर पडलीय. आयुष्यमान खुराना स्टारर आर्टिकल १५ या सिनेमाला करणी सेनेसह आंतरराष्ट्रीय ब्राह्मण महासंघानं विरोध केलाय. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमात ब्राह्मण समाजाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आलाय. हा सिनेमा कोणत्याही परिस्थितीत रिलीज करु देणार नाही असा इशारा करणी सेनेसह आंतरराष्ट्रीय ब्राह्मण महासंघानं दिलाय.

दुसरीकडे या सिनेमात कोणत्याही समाजाची बदनामी केली नसल्याचा दावा सिनेमाच्या दिग्दर्शकांनी केलाय. यापूर्वीही पद्मावतसारख्या सिनेमाला करणी सेनेकडून विरोध करण्यात आला होता. ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमांना विरोध करण्याचे प्रकार गेल्या अनेक काळात घडलेत. विशेष म्हणजे सिनेमा न पाहताच रिलीजपूर्वीच असे विरोध केले जातात, यात आता आणखी सिनेमाची भर पडलीय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live