#INDvsSA | टीव्हीत बघण्यापासून टीव्हीत दिसण्याचा शाहबाज नदीमचा प्रवास

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

रांची : काय कमाल आहे बघा की रांची कसोटी सामना चालू होण्याअगोदर एक दिवस मी भारतीय संघाचा खेळ टीव्हीत बघत होतो. आणि अचानक भारतीय संघाची मानाची कॅप घालून मी टीव्हीत खेळताना दिसू लागलो. एकंदरीतच टीव्हीत बघण्यापासून टीव्हीत दिसण्याचा प्रवास स्वप्नवत आहे.

झारखंड संघाकडून खेळताना क्रिकेटचा भरपूर आनंद लुटला ज्याने मला भारताकडून खेळायचे स्वप्न बघता आले. एक नक्की की 15 वर्ष रणजी करंडक सामने किंवा गेली काही वर्ष आयपीएल आणि भारतीय ‘अ’ संघाकडून सामने खेळल्याने मला दचकायला झाले नाही कसोटी खेळताना. मला चांगली कामगिरी करायचा विश्वास जाणवत होता. पहिली विकेट मला टेंबा बवुमाची मिळाली ती सुद्धा चेंडूला उंची देऊन त्याचा आनंद वेळा आहे.

मला भारतीय संघात कोणी नवखेपणा जाणवू दिला नाही. सगळ्या खेळाडूंनी मला आपलेसे केले ज्याने होते नव्हते ते दडपणही उडून गेले आणि खेळावर लक्ष केंद्रित करता आले. तिसर्‍या दिवशी सगळ्याच गोलंदाजांनी चांगला मारा करून दडपण वाढवले ज्याने समोरचे फलंदाज जाळ्यात सापडत गेले.

Web Title: article on journey of Shahbaz nadeem 

संबंधित बातम्या

Saam TV Live