कृत्रिम पावसाला मॅान्सूनचा खो..  

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद
गुरुवार, 18 जुलै 2019

राज्याच्या अनेक भागांत पावसानं ओढ दिलीय. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलीय तर काही भागांत पावसाअभावी पेरणीच झालेली नाही. बहुतेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय..त्या पार्श्वभूमीवर राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणाराय. मात्र, हा प्रयोग होण्याआधीच अनेक प्रश्न उपस्थित झालेत.

राज्याच्या अनेक भागांत पावसानं ओढ दिलीय. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलीय तर काही भागांत पावसाअभावी पेरणीच झालेली नाही. बहुतेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय..त्या पार्श्वभूमीवर राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणाराय. मात्र, हा प्रयोग होण्याआधीच अनेक प्रश्न उपस्थित झालेत.

राज्याच्या अनेक भागांत पावसानं ओढ दिलीय. मॉन्सूनचे ढगच गायब झालेत. जर ढगच नाहीत तर पाऊस पाडणार कशातून, असा सवाल विचारला जातोय. यंदा एप्रिल महिन्यातच कळलं होतं की, राज्याच्या अनेक भागांत पाऊस ओढ देणाराय. असं असताना, कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यास इतका उशीर का झाला. दुसरा मुद्दा उपस्थित होतोय तो आहे आपल्याकडे असलेल्या यंत्रणेचा. कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा म्हटलं तरी त्याची यशस्विता कशी तपासायची हा मुद्दा आहेच.

महाराष्ट्रात पावसाची नोंद 24 तासांनंतर होते. ही नोंदही ठरावीक ठिकाणीच होते. कृत्रिम पावसाची नोंद घ्यायची झाल्यास 5 किलोमीटरवर पर्जन्यमापक असणं गरजेचं आहे. मात्र, राज्यात कुठेच ही यंत्रणा नाही. ढगांमध्ये रसायन फवारल्यानंतर ढग वाऱ्यासोबत 30 ते 40 किलोमीटर जातात. त्यावेळी मधल्या भागात पडलेला पाऊस कृत्रिम की नैसर्गिक हा प्रश्नही निर्माण होतो.

दरम्यान, राज्यात सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं एकाचवेळी 23 जुलै रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणारय. त्यासाठी 30 कोटी रुपये खर्च केला जाणाराय. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया झाली असून, केंद्राच्या परवानग्या घेतल्या जातायत. 

राज्यातल्या बळीराजाला आणि सामान्य नागरिकांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी पुरेसा पाऊस होणं  गरजेचं आहे. हा पाऊस कृत्रिम की नैसर्गिक याच्याशी त्याला देणंघेणं नाही. मात्र, सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असेल तर तो प्रयोग यशस्वी व्हावा, याची ग्वाही मिळणंही तितकंच गरजेचं आहे.

WEB TITLE : MARATHI NEWS ARTIFICIAL RAIN AND TECHNICAL PROBLEMS IN IT 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live