इंधन दरवाढीवर केंद्राचा अडीच रुपयांचा उतारा; अर्धा भार सोपवला राज्य सरकारवर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण या अपेक्षांवर अरूण जेटलींनी पाणी फिरवलंय. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अवघी अडिच रुपयांची इंधनदरकपात जाहीर केलीय.

इंधन दरवाढीने केंद्राच्या तिजोरीत फार भर पडत नाही असं सांगत जेटलींनी दरकपातीचं त्रांगडं राज्यांच्या गळ्यात टाकलंय.

जेटलींच्या घोषणेनंतर महाराष्ट्र सरकारनंही तातडीनं अडीच रूपयांची दरकपात जाहीर केलीय.
इंधनाचे भाव शंभरीच्या घरात असताना अवघी पाच रुपये दरकपात करण्यात आलीय. गेल्या सहा महिन्यांत इंधनाचे भाव सरासरी  20 रुपयांनी वाढल. त्यात आता सरकारनं पाच रुपये कमी केले. त्यामुळं आवळा देऊन कोहळा घेतल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live