अरूणाचलमध्ये ITBP बसवर दरड कोसळून 5 जवान ठार  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 जून 2018

अरूणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे आयटीबीपीच्या बसवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 5 जवानांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत इतर6 जवान गंभीररित्या जखमी झालेत.

लोअर सिआंग जिल्ह्यातील बसर अकाजन मार्गावर हा अपघात झाला. पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगरावरून आलेला एका मोठा दगड थेट आयटीबीपीच्या बसवरच जाऊन पडला.

गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजता लोअर सिआंगमधील मुख्यालय लिकाबलीपासून पाच किलोमीटर लांब अंतरावर ही दुर्घटना घडलीय. भारत-तिबेट सीमा पोलिसाचे आयटीबीपीचे जवान पश्चिमी सिआंग जिल्ह्यातील बसरवरून सिआंगला जात होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live