ओवेसींकडून दहशतवाद्यांना आर्थिक मदत, भाजपचे आमदार टी. राजासिंह यांचा गंभीर आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जून 2019

हैदराबाद : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे.

तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून ओवेसी हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. ओवेसी यांच्यावर तेलंगणातील गोशामहल येथील आमदार टी. राजासिंह यांनी हा आरोप केला आहे. तसेच राजासिंह यांनी ओवेसी हे 2024 मध्ये खासदार म्हणून पराभूत होतील, कारण भाजप याठिकाणी जिंकून येईल असे म्हटले आहे.

राजासिंह म्हणाले, की ओवेसी दहशतवाद्यांना पैसे पुरवत आहेत. 2024 मध्ये ओवेसीचा अंत निश्चित आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात विविध देशांचे 7 हजारहून अधिक मुस्लिम नागरिक वास्तव्यास आहेत. जुन्या हैदराबादमध्ये त्यांनी काहीच कामे केली नसल्याने नागरिक त्यांच्याविरोधात आहेत. भाजप 2024 मध्ये ही जागा नक्की जिंकणार. हैदराबाद हे दहशतवाद्यांसाठी सेफ झोन झाले आहे. 

Web Title: Asaduddin Owaisi is funding terrorists says BJP MLA Raja Singh

संबंधित बातम्या

Saam TV Live