आसारामला जन्मठेप; जिवंत असेपर्यंत आसाराम राहणार जेलमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

जोधपूर : बलात्कार आणि अत्याचाराविरोधात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.. जोधपुरच्या विशेष कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.. न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.. शिक्षेची सुनावणी सुरु असतांना आसाराम वारंवार पाणी पीत असल्याची माहीती मिळतेय.. कोर्टाने सुनावलेली शिक्षा ऐकल्यानंतर बलात्कारी आसारामला रडू कोसळलं.. त्याचबरोबर इतर दोन दोषी शिल्पी आणि शरद यांना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

जोधपूर : बलात्कार आणि अत्याचाराविरोधात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.. जोधपुरच्या विशेष कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.. न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.. शिक्षेची सुनावणी सुरु असतांना आसाराम वारंवार पाणी पीत असल्याची माहीती मिळतेय.. कोर्टाने सुनावलेली शिक्षा ऐकल्यानंतर बलात्कारी आसारामला रडू कोसळलं.. त्याचबरोबर इतर दोन दोषी शिल्पी आणि शरद यांना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. त्यामुळे, जोपर्यंत आसाराम जिवंत आहे तोपर्यंत आसाराम जेलमध्ये राहणार आहे.. 

2013 मध्ये जोधपूर जवळील आसारामच्या आश्रमात एका उत्तर प्रदेशातील 16 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार जोधपूर विशेष न्यायालय मध्यवर्ती कारागृहाच्या भागातच हा निकाल जाहीर केला. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live