काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यपदी अशोक चव्हाण यांची फेरनिवड?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यपदी अशोक चव्हाण यांची फेरनिवड होण्याची शक्यता आहे. याबाबत खासदार हुसेन दलवाई यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावरच आगामी विधानसभा निवडणुकीची धुरा असण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर काँग्रेसचे राज्यातील प्रमुख म्हणून अशोक चव्हाण यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांची काँग्रेस प्रदेशाध्यपदावरून उचलबांगडी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता दलवाई यांनी केलेल्या या विधानानंतर अशोक चव्हाण हेच अध्यक्षपदावर राहतील, हे काही प्रमाणात निश्चित झाले आहे. 

दरम्यान, हुसेन दलवाई यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेतृत्त्व यावर काय निर्णय घेते, अशोक चव्हाण हे अध्यक्षपदावर असतील का, हे लवकरच स्पष्ट होईल. 

Web Title: Ashok Chavan remains as State President of Congress

संबंधित बातम्या

Saam TV Live