अशोक चव्हाण राजीनाम्यावर ठाम, बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अशोक चव्हाण आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे येत्या काही दिवसांतच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याच्या नावाची घोषणा होईल. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता जास्त आहे.

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अशोक चव्हाण आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे येत्या काही दिवसांतच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याच्या नावाची घोषणा होईल. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता जास्त आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दिला आहे. स्वतः अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्याचवेळी गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला दोन जागांवर यश मिळाले होते. तितक्याही जागा यंदाच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या नाहीत. केवळ एकाच जागेवर काँग्रेसला यश मिळाले आहे. 

चव्हाण यांच्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत. अशोक चव्हाण यांनी राजीनामा मागे घेऊन प्रदेशाध्यक्षपदी कायम राहावे, अशी सूचना राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे केली. किमान विधानसभा निवडणुकीपुरते तरी त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशीही सूचना करण्यात आली. पण अशोक चव्हाण राजीनामा मागे न घेण्यावर ठाम आहेत.

गेल्या शनिवारी राज्यातील पराभवाबद्दल नेत्यांनी राहुल गांधी यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर अशोक चव्हाण हे या पदावर राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांतच काँग्रेस अध्यक्षांकडून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली जाईल. काँग्रेस पक्षाकडून काही दिवसांपू्र्वीच बाळासाहेब थोरात यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीचेही ते सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड होण्याची शक्यता जास्त आहे.

Web Title: Ashok Chavan steps down as Maharashtra Congress chief Thorat could be his successor


संबंधित बातम्या

Saam TV Live