15 महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तान येणार आमनेसामने.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

यंदा #AsiaCup20148 मध्ये तीन संघाचे दोन ग्रुप असून भारत ब गटात पाकिस्तान आणि हाँगहाँगसोबत तर अ गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत.

आजपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.

तब्बल 15 महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी 19 सप्टेंबरला भिडणार आहेत. भारताला हाँगकाँगविरुद्ध 18 तारखेला सलामीचा सामना खेळायचा असून दुसऱ्या दिवशी पाकविरुद्ध लढत होईल. 2016 मध्ये आशिया चषक टी-20 पद्धतीने खेळवला होता. पण यावर्षी पुन्हा वन डे पद्धतीने होणार आहे.

यंदा तीन संघाचे दोन ग्रुप असून भारत ब गटात पाकिस्तान आणि हाँगहाँगसोबत तर अ गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत.

WebTitle : marathi news asia cup 2018 india vs pakistan 


संबंधित बातम्या

Saam TV Live