#AtalBihariVajpayee अटलबिहारी वाजपेयी 'या' आजाराने त्रस्त

#AtalBihariVajpayee  अटलबिहारी वाजपेयी 'या' आजाराने त्रस्त

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली आहे. वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आले आहे. फार पूर्वीच अटलजींना डिमेंशियासारख्या आजाराने ग्रासले होते. या व्यतिरिक्त ते किडनीच्या आजारानेही त्रस्त आहेत.

डिमेंशिया म्हणजे काय?
डिमेंशिया म्हणजे एक असा आजार ज्यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. डिमेंशिया झालेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा पाठीमागचे सगळे विसरून जातो. डिमेंशिया झालेल्या व्यक्तीमध्ये 60 ते 80 टक्के केसेस या अल्झायमरच्या असतात. अशा व्यक्ती सतत उदास आणि दुःखी राहतात. या व्यक्तींना आपलं नाव, ठिकाणं, एखाद्या व्यक्तीसोबत सुरू असलेलं बोलणं लक्षात ठेवताना अनेक अडचणी येतात. तसेच, सतत उदास राहणं, एखाद्याशी बोलताना त्रास होणं, वागण्यात बदल होणे, एखादी गोष्ट खाताना त्रास होणे, चालायला त्रास होणे. ही डिमेंशिया या रोगाची लक्षणे आहेत, यामुळे वाजपेयींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचबरोबर वाजपेयी किडनी संक्रमणामुळेही त्रस्त आहेत. त्यांची एकच किडनी काम करत आहे. 11 जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं डायलिसिस करण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 2009 मध्ये त्यांना स्ट्रोक आल्यानंतर त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता फार कमी झाली होती.

WebTitle : marathi news atal bihari vajpayee dementia disease 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com