ऍट्रोसिटी कायद्याबद्दल नरेंद्र मोदींनी सोडलं मौन...  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

ऍट्रोसिटी कायद्यात बदल करण्याच्या मुद्यावरून देश पेटलेला असताना पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर आपलं मौन सोडलंय. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच चालत आहोत. शांती आणि ऐक्य हा बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा होता. याबरोबरच आम्ही समाजातील गरीबात गरीब व्यक्तींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहोत, असे मोदींनी म्हंटलय. यावेळी मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. भारतीय राज्यघटनेचे जनक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आमच्या सरकारशिवाय इतर कोणीही यथोचित सन्मान केला नाही, असं सांगत विरोधक राजकारण करत असल्याचंही मोदींनी म्हंटलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live