आता अॅट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ अटक होणार नाही..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 मार्च 2018

सर्वोच्च न्यायालयानं अॅट्रॉसिटी कायद्यात मोठे बदल केले आहेत. आता अॅट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ अटक होणार नाही. सर्वोच्चन्यायालयाने अटकेपूर्वी प्राथमिक चौकशीचे आदेशही पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर न्यायालयानं अटकेपूर्वी जामीन अर्ज न मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे. त्यामुळे आता अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास जामीन मिळू शकणार आहे. एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून त्रास देण्यासाठी अॅट्रॉसिटी या कायद्यांतर्गत खोटे गुन्हा दाखल केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. दरम्यान मुख्य प्रवाहातील बहिष्कृत समाजाला न्याय मिळावा यासाठी अॅट्रॉसिटी आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live