खासदार ओमराजे निंबाळकरांवर तरुणाचा चाकूहल्ला

मोहिनी सोनार
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

उस्मानाबाद : एक खळबळजनक बातमी येते आहे. एका खासदारावर चक्क चाकूहल्ला झाल्याचं समोर आलं आहे.  

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. पडोळी इथे एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला...अजिंक्य टेकाळे असं या हल्लेखोराचं नाव आहे.

मात्र या हल्ल्यामागचं नेमकं कारण समोर आलं नाहीय. दरम्यान हे हल्ला शिवसेनेच्याच कार्यकर्त्याने केल्याचं बोललं जातं आहे. उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ओमराजे निंबाळकर गावातून जात होते. त्याच वेळी ही घटना घडली.

अजिंक्य टेकाळे या तरुणाने आधी त्यांच्याशी हातमीळवणी केली, आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने निंबाळकर यांच्या हातावर वार केले. यात ओमराजे निंबाळकर जखमी झाले आहेत. तर अजिंक्य टेकाळे असं हल्लेखोराचं नाव असल्याचं समजतं आहे..
या घटनेमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. हा हल्ला झाल्यानं राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. 
दरम्यान याबाबत खासदार निंबाळकरांनी मी स्वस्थ असल्याची माहिती देत कार्यकर्त्यांना शांत केलं आहे. मात्र या हल्ल्याचे पडसाद काय उमटतील हे येणारा काळंच सांगेल.

Web Title - Attack on MP Omraje Nimbalkar 

संबंधित बातम्या

Saam TV Live