भयंकर! PFच्या पैशांसाठी मुलांचा आईला जाळण्याचा प्रयत्न

साम टीव्ही
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020
  • PFच्या पैशांसाठी मुलांचा आईला जाळण्याचा प्रयत्न
  • बीडच्या केजमधील कानडी माळी इथली घटना
  • गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलाय
  • पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुलांवर गुन्हा दाखल

पीएफच्या पैशांसाठी 2 मुलांनी आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. बीडच्या केज तालुक्यात कानडी माळी या गावात ही धक्कादायक घटना घडलीय. कानडी माळी गावकऱ्यांच्या संतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. पीडित महिलेचे पती हे पोलिस सेवेत कार्यरत होते. पण काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले. अखेर त्यांचा शोध न लागल्याने त्यांना मयत घोषीत करण्यात आलं. त्यांच्या पत्नीला 9 लाख रुपये पीएफची रक्कम मिळाली. 

मात्र ही रक्कम आपल्याला मिळावी यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी तगादा लावला होता. आईनं काही रक्कम आधीच मुलांना दिली होती. मात्र सर्व पैसे आपल्यालाच मिळावे यासाठी मुलांनी तगादा लावला होता. यासाठी मुलांनी आपल्या जन्मदात्या आईला अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर इंदुबाई यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इंदुबाई कुचेकर यांचे पती पोलीस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले. शोध न लागल्याने त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात इंदुबाई कुचेकर यांना पीएफचे नऊ लाख रुपये मिळाले. मात्र ही रक्कम आपल्याला मिळावी. यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी तगादा लावला होता.

या मिळालेल्या पैशांमधील काही रक्कम मुलांना देऊन देखील, उर्वरित रक्कम मिळावी. यासाठी मुलांनी आपल्या जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर इंदुबाई यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बीडमधील या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जन्मदात्या मुलांनीच आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने सर्वच स्तरातून या मुलांवर संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live