एसटी महामंडळाच्या तिजोरीवर ४७ लाखांचा भार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या वेतनवाढीने एसटीच्या तिजोरीवर साधारण ४७ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे.  एसटी महामंडळात वेतन कराराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. गेल्या वर्षी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना आणि ‘इंटक’ने वेतन कराराऐवजी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ दिली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यात गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांनी संपही केला होता. हा प्रश्‍न न्यायालयातही गेला, अखेर अनेक दिवसांच्या प्रलंबित प्रश्‍नांनंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढीची घोषणा केली. एसटीच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे.

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या वेतनवाढीने एसटीच्या तिजोरीवर साधारण ४७ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे.  एसटी महामंडळात वेतन कराराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. गेल्या वर्षी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना आणि ‘इंटक’ने वेतन कराराऐवजी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ दिली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यात गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांनी संपही केला होता. हा प्रश्‍न न्यायालयातही गेला, अखेर अनेक दिवसांच्या प्रलंबित प्रश्‍नांनंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढीची घोषणा केली. एसटीच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे. औरंगाबाद विभागाच्या आठ आगारांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीने गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७.२९ लाखांचा भार पडला. वेतवाढ दिल्यानंतरही कामगारांत नाराजी आहे. 

 

आर्थिक स्तर उंचाविण्याची गरज 
एसटी कर्मचाऱ्यांचे परिश्रम अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात अधिक आहेत. रोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करूनही चालक-वाहकांना पुरेसे वेतन नाही. तोकडे वेतन असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावत नाही. कर्मचारी मुलांना चांगल्या शाळेतही घालू शकत नाहीत. म्हणूनच परिवहनमंत्र्यांच्या चालकांना मिळणारे वेतन एसटीच्या चालकांना मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

Web Title: The additional burden of Rs 47 lakh on the ST


संबंधित बातम्या

Saam TV Live