24 आठवड्यांच्या गर्भपात करण्यास परवानगी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

औरंगाबाद - बीड जिल्ह्यातील मंझरी (ता. पाटोदा) येथील मजूर कुटुंबातील महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भात दोष आढळल्याने होणाऱ्या बाळाची जगण्याची शक्‍यता कमी होती. त्यामुळे महिलेने खंडपीठात धाव घेत गर्भपात करण्यास परवानगी मागितली. प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी गर्भपातास मान्यता दिली. 

मजूर महिलेच्या पोटात वाढणारा 24 आठवड्यांचा गर्भ भविष्यात शस्त्रक्रिया करून वाचविता येऊ शकतो, असा अहवाल शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या वतीने खंडपीठात सादर करण्यात आला. या महिलेच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या अनियंत्रित हालचालींवरून त्यांनी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीत गर्भात व्यंग असल्याचे निदर्शनास आले. महिलेने गर्भपात करण्यासाठी खंडपीठात याचिका दाखल करून परवानगी मागितली होती. 

Web Title: Approval twenty four weeks of miscarriage
 
संबंधित बातम्या

Saam TV Live