स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युतीचे नेते लागले कामाला

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युतीचे नेते लागले कामाला

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे युतीचे नेते कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

अंबादास दानवे यांनी युतीच्या नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्य,नगरसेवकांच्या भेटीगाठीदेखील सुरू केल्या आहेत. जालन्यात सोमवारी (ता. 29) शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मतदारांची बैठक राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या
निवासस्थानी पार पडली. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकत सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. ता. एक ऑगस्टला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे अंबादास दानवे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील युतीच्या नेत्यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी जालना येथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सभापती यांची महत्त्वाची बैठक पार
पडली. 
 
कॉंग्रेसमधून झांबड,  कुलकर्णी इच्छुक 
युतीचा उमेदवार जाहीर होऊन ते कामाला लागलेले असताना दुसरीकडे कॉंग्रेसचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी, विद्यमान आमदार सुभाष झांबड हे लढण्यास इच्छुक आहेत; मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. 
 
आकड्यांच्या खेळात युतीचे पारडे जड 
औरंगाबाद-जालना जिल्ह्यांतील मतदारांचे संख्याबळ पाहता युतीचे पारडे जड समजले जाते; परंतु ऐनवेळी चमत्कार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. संख्याबळाचा विचार केला तर सर्वाधिक 180 मतदार भाजप, शिवसेना- 141, कॉंग्रेस 170, राष्ट्रवादी 80, एमआयएम 28, तर रिपाइं, बसप व इतर 57 असे एकूण 656 मतदार आहेत. 

Web Title: BJP-Shiv Sena prepares for election

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com