विधानसभेसाठी युतीचा फॉर्म्युला ठरला;दोघेही समान जागा लढवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जून 2019

औरंगाबाद -  लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटकपक्षांना 18 जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात 135-135 जागांचा फॉर्म्युला असणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व मराठवाडा विकास मंडळातर्फे आयएमए सभागृहात राज्यातील दुष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका, या विषयावर बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ""विधानसभेची तयारी सुरू झाली असून, यात महायुतीतील छोट्या घटकपक्षांना 18 जागा सोडणार आहे. उर्वरित 270 पैकी 135-135 जागांवर शिवसेना-भाजप युती समसमान जागांवर लढणार आहे.'' 

दुष्काळाच्या उपाययोजना सुरू 
दुष्काळ जाहीर केल्यानंतर राबवावयाच्या विविध उपाययोजनांना शासनाने तत्काळ सुरवातही केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील 28 हजार गावांमध्ये सरकार दुष्काळी उपाययोजना राबवीत आहे. त्याचबरोबर केंद्राने जाहीर केलेल्या 151 तालुक्‍यांमध्येही उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्यात एक हजार 501 चारा छावण्या आहेत. यामध्ये 10 लाख चार हजार 684 जनावरांना चारा, पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. केंद्र शासनाकडून प्रतिजनावर 70 रुपये, राज्य शासनाकडून 30 रुपये अशा प्रकारे प्रतिजनावर 100 रुपयांचे अनुदान चारा छावणीमालकांना देण्यात येत आहे. राज्य शासनाला प्रतिदिवस सव्वादोन कोटी रुपये लागत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Web Title: BJP ShivSena will contest the equal seats for the Assembly elections

संबंधित बातम्या

Saam TV Live