माझ्या जपामुळे रुग्ण बरे होतात- शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद : 'प्रमोद महाजन यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर ते रुग्णालयात होते. त्यांचा प्रत्यक्ष हात धरून जप न केल्यामुळे त्याचा फार उपयोग झाला नाही आणि मी जीवनात प्रथमच अपयशी ठरलो', असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज (शनिवार) केले. वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असलेल्या खैरे यांनी एका आरोग्य मेळाव्यामध्ये ही विधाने केली. 'जप केल्यावर रुग्ण बरे होतात', असा दावा त्यांनी केला. 

या भाषणामध्ये खैरे यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे उदाहरण दिले. 'प्रमोद यांच्यावेळी मुंडेसाहेब मला म्हणाले होते, की तू काहीतरी कर! सिद्धिविनायकला वगैरे जा.. फूल वगैरे घेऊन ये.. त्यानंतर मुंडेंसारखी मोठी व्यक्ती रडायला लागली', असे खैरे म्हणाले. 

Web Title: Chandrakant Khaire creates controversy with a statement on Pramod Mahajan

संबंधित बातम्या

Saam TV Live