औरंगाबादमध्ये शाळांना सुट्टी; अतिवृष्टी व पुरस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : जिल्ह्यातील  ज्या शाळेत धोकादायक परिस्थिती उद्भवु शकते अशा गावातील शाळांना सुटी देणेबाबत निर्णय घेण्यात यावा. असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.

मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरस्थिती लक्षात घेता शाळांना सुटी देणे बाबतचा अधीकार शासन स्तरावरुन जिल्हापरिषदेच्या जिल्हाधिकारी यांना  प्रदान करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या तालुक्यात शाळा भरविणे धोकादायक होवु शकते अशा बाबतीत गट विकास अधिकारी यांनी सुटी बाबत निर्णय घ्यावा. आणि कार्योत्तर मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करुन, जिल्हा परिषदेस अहवाल सादर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना दिले आहेत.

जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाकडून अचानक घेण्यात आला. आज सोमवारी (ता. 5) पहाटेपासून पाऊस पडत असल्याने बहुतांश मुले शाळेतच गेले नाहीत. मात्र, जे विध्यार्थी सकाळी लवकर उठून पावसात भिजत शाळेत गेले होते. त्यांना सुट्टी जाहीर केल्यामुळे परत घरी पाठवण्यात आले.

Web Title: due to hevay rainfall schools are off in Aurangabad

संबंधित बातम्या

Saam TV Live