औरंगाबादमधला कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबादच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला काही केल्या यश येताना दिसत नाहीये, त्यामुळे औरंगाबादमधला कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या जवळ काही जागा निश्चित केल्या आहेत. मात्र या जागांवर कचरा डम्प करण्याला तिथल्या नागरिकांचा विरोध आहे. पाडेगावमध्येही कचरा टाकायला आलेल्या वाहनचालकासोबत तिथल्या नागरिकांनी बाचाबाची केली. यावेळी संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांच्या वाहनचालकावर दगडफेक करत त्याला पळवून लावलं.

दरम्यान, यावरुन आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

WebTitle : marathi news aurangabad dumoing problem may start again 

संबंधित बातम्या

Saam TV Live