औरंगाबादकरांना आता कचरा उचलण्यासाठी भरावा लागणार कर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : कचरा उचलण्यासाठी आता औरंगाबादकरांना कर भरावा लागणार आहे. यामध्ये  छोट्या व्यापाऱ्यांना दररोज कचऱ्यापोटी 2  ते 10 रुपये  तर मोठ्या व्यापाऱ्यांना 30 ते 100 रुपये द्यावे लागणार आहे, या करातून सर्वसामान्यही सुटलेले नाहीत. औऱंगाबादकरांना दररोज 1 रुपये म्हणजेच वर्षाला 365 रुपये कर भरावे लागणार आहे. कचरा प्रश्न सोडवण्यात महापालिका अपयशी ठरलीय दुसरीकडे महापालिकेने कर वसूल करण्याचा निर्णय घेतल्यामुळं नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय

कचऱ्याच्या भस्मासुराचा राज्यातील प्रमुख शहरांना विळखा पडत आहे. महापालिका प्रशासन ‘डोअर टू डोअर कलेक्‍शन,’ ओल्या व सुक्‍या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरत असल्याने डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचे अक्षरक्षः डोंगर उभे आहेत. त्यामुळे शहर परिसरातील हवा, जमिनीतील पाण्याचे साठे दूषित होताहेत; दुसरीकडे डास, माशा, उंदीर, श्‍वानांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सरकारचे आदेशही पायदळी तुडविले जात आहेत. 

औरंगाबादेत कचराकोंडी 
औरंगाबाद शहरात रोज सुमारे ४५० टन कचरा जमा होतो. त्यावर प्रक्रियाच होत नसल्याने नारेगाव कचरा डेपोवर सुमारे २० लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे. नारेगाव परिसरातील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून कचरा डेपोविरोधात आंदोलन सुरू केलंय. तेव्हापासून पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल येथे कचराप्रक्रिया केंद्रांच्या जागेवर कचरा टाकला जातोय. सरकारने ९१ कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन डीपीआर तयार केला असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. 

WebTitle : marathi news aurangabad dumping issue tax for collecting waste 

संबंधित बातम्या

Saam TV Live