औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 मार्च 2018

औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय. आता या प्रश्नाला हिंसक वळण लागलंय. औरंगाबादच्या पडेगावजवळच्या मिटमिटा परिसरात जमावानं कचऱ्याच्या गाडी जाळली असून अनेक गाड्या फोडल्या आहेत. इतकच नाही तर जमावानं केलेल्या दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नऴकांड्या फोडल्या आहेत. गेल्या 20 दिवसांपासून औरंगाबादमधल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. नारेगावच्या रहिवाशांनी कचरा टाकायला विरोध केल्यानंतर कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न औरंगाबाद महापालिकेसमोर पडलाय.

औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय. आता या प्रश्नाला हिंसक वळण लागलंय. औरंगाबादच्या पडेगावजवळच्या मिटमिटा परिसरात जमावानं कचऱ्याच्या गाडी जाळली असून अनेक गाड्या फोडल्या आहेत. इतकच नाही तर जमावानं केलेल्या दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नऴकांड्या फोडल्या आहेत. गेल्या 20 दिवसांपासून औरंगाबादमधल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. नारेगावच्या रहिवाशांनी कचरा टाकायला विरोध केल्यानंतर कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न औरंगाबाद महापालिकेसमोर पडलाय. अशातच आता कचरा टाकायला गेलेल्या कचरा गाड्या फोडून, दगडफेक करण्याचे प्रकारही सुरू झालेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live