औरंगाबादचा कचराप्रश्न विधानसभेत पेटला..  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

औरंगाबादच्या कचराप्रश्नाचे पडसाद विधानसभेत उमटलेत. विरोधकांनी औरंगबादच्या कचराप्रश्नी कारवाईची मागणी केली आहे. कचराप्रश्न पेटलेला असताना पोलिसांनी अयोग्य पद्धतीनं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याचा, आरोप अजित पवार यांनी केली. निष्पाप लोकांवर दगडफेक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं. इतकंच नाही तर त्यांच्यी न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. दरम्यान यावर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उत्तरावर विरोधकांचं समाधान झालं नाही. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली.

औरंगाबादच्या कचराप्रश्नाचे पडसाद विधानसभेत उमटलेत. विरोधकांनी औरंगबादच्या कचराप्रश्नी कारवाईची मागणी केली आहे. कचराप्रश्न पेटलेला असताना पोलिसांनी अयोग्य पद्धतीनं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याचा, आरोप अजित पवार यांनी केली. निष्पाप लोकांवर दगडफेक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं. इतकंच नाही तर त्यांच्यी न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. दरम्यान यावर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उत्तरावर विरोधकांचं समाधान झालं नाही. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं होतं. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live