औरंगाबादमध्ये मानपमान नाट्य; खैरे आणि जलीलमध्ये वादाची ठिणगी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

खासदार इम्तियाज जलील यांना बछड्यांच्या नामकरण सोहळ्याला डावलल्याविरोधात एमआयएमचे नगरसेवक रस्त्यावर उतरले. त्यांनी काळे झेंडे दाखवून महापालिका प्रशसनाचा निषेध केला. औरंबादमधील सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीच्या चार बछड्यांचा नामकरण सोहळा होता.

या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत इम्तियाज जलील यांचं नावचं नव्हत. दुसरीकडे शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह युतीच्या आमदारांना प्रमुख पाहुणे म्हणून स्थान देण्यात आलं होतं. याविरोधात एमआयएम आक्रमक झालीय. 

सत्ताधारी शिवसेनेनं मात्र एमआयएम क्षुल्लक कारणातून राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. औरंगाबादमधील शिवसेना आणि एमआयएम वाद तसा नवा नाही. लोकसभा निवडणुकीतील खैरेंच्या पराभवानंतर तो आणखी उफाळून आला. आता तो बछड्य़ांच्या बारशाच्या निमंत्रण पत्रिकेत जलील यांच नाव नसण्याच्या कारणातून पुन्हा पेटलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live