औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची रेल्वेखाली उडी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलीये. मुकुंदवाडी परिसरातील हा युवक असल्याचं समोर येतंय. रेल्वे समोर उडी घेऊन या युवकाने आत्महत्या केळी आहे. प्रमोद होरे असं या तरुणाचं नाव आहे. प्रमोद गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. आत्महत्या करण्याआधी फेसबुक वरून त्याने आत्महत्येची कल्पना दिली होती. दरम्यान,  या पोस्ट नंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याचा तीन तास शोध घेतला.

औरंगाबादमध्ये आरक्षणासाठी प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येताच मराठा आंदोलक आक्रमक झालेत. औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोकोही केलाय. मुकुंदवाडी परिसरात आंदोलक रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली. दरम्यान प्रमोद पाटील यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live