VIDEO | औरंगाबादमध्ये MIMच्या मंदिर आंदोलनावर शिवसेना आणि मनसेच्या प्रतिक्रिया

साम टीव्ही
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

औरंगाबादमध्ये होणारं एमआयएमचं मंदिर आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. मात्र तीन दिवसांनंतर आपण आंदोलन करू असं इम्तियाज जलील यांनी म्हंटलंय. खडकेश्वर मंदिर सुरू करावं या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील आंदोलन करणार होते. मात्र त्यावरून धर्माचं राजकारण चांगलंच पेटलं.

मंदिर उघडणारे इम्तियाज जलील कोण असं म्हणत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंदिर परिसरात धडक दिली तर दुसरीकडे मनसेचे नेतेही याठिकाणी दाखल झाले. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या दरम्यान इम्तियाज जलील यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानं मोठा तणाव निवळला...पण, उद्या मस्जिद उघडून नमाज अदा करणार असल्याचाही इशारा इम्तियाज जलील यांनी सरकारला दिलाय.

दरम्यान MIMच्या आंदोलनावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मनसेनं काय प्रतिक्रिया दिली होती आपण पाहूयात.-

संबंधित बातम्या

Saam TV Live