एका दिवसात इंजिनिअर्सपेक्षाही जास्त कमाई; फक्त 15 मिनिटांत 30 केली हजारांची कमाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

औरंगाबादसह जालना जिल्ह्यात माकडांनी अक्षरश: धुडगूस घातलाय. पिकांची नासाडी करणं, लोकांना चावा घेणं या मर्कटलीलांमुळे ग्रामीण भागातले लोक त्रासले आहेत.

यावर रामबाण उपाय म्हणून वनखात्यानं माकड पकडण्यासाठी 25 वर्षांचा अनुभव असलेल्या समाधान गिरींची निवड केली. या कामासाठी त्यांना प्रतिमाकड 400 रूपये देण्याचं ठरलं आणि मग काय माकडं पकडण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या समाधान गिरींनी अवघ्या पंधरा मिनिटात 73 माकडांना जेरबंद केलं. अवघ्या काही क्लुप्या लढवत या मंकीमॅननं 15 मिनिटांत 30 हजारांची कमाई केलीय. जी एका इंजिनिरच्या रोजच्या कमाईपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. 

समाधान गिरी यांच्या साध्या सोप्या हातखंड्यानं इतकी सगळी माकडं जेरबंद झालीयेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी हा मंकीमॅन खऱ्या अर्थानं हिरो ठरलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live