औरंगाबादमधील शरद पवारांच्या सभेचा मार्ग मोकळा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादीच्या सभेला पोलिसांची परवानगी; औरंगाबादमधील शरद पवारांच्या सभेचा मार्ग मोकळा.  राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा आज समारोप..

 

औरंगाबादमध्ये आज होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या सांगता सभेला परवानगी देण्यात आलीये. रस्त्यावर स्टेजसाठी पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलंय. त्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल झालेत. शेतकरी आत्महत्येचा प्रतिकात्मक देखावा साकारण्यात आलाय.  विभागीय आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादीची सभा होतेय. हल्लाबोल यात्रेचा समारोप शरद पवार यांच्या भाषणानं होणारे. पण महापालिकेनं आधी पवारांच्या सभेला परवानगी नाकारली होती. परवानगी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीची बरीच धावपळही झाली होती. दरम्यान आता सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हल्लाबोल यात्रेची सांगता ही शरद पवार यांच्या भाषणानच होणारे.


संबंधित बातम्या

Saam TV Live