औरंगाबादेतील इंटरनेट सेवा अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

औरंगाबाद : मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजारसह इतर ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर अफवाचे पीक पसरू नये म्हणून औरंगाबादेतील इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. 

दोन गटात लाठ्याकाठ्या आणि तलवारीने मारहाण झाल्यानंतर मोठी दंगल उसळली. पोलिसानी दंगेखोरांवर प्लास्टिक बुलेट्स आणि अश्रूधुराच्या नालकांड्या फोडल्या. यानंतर शनीवारी (ता. १२) पहाटे पुन्हा उद्रेक झाला. दरम्यान सोशल मीडियावरून या घटनेचे फोटो, व्हिडिओ आणि अफवा पसरवल्या जात आहेत. अफवामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते अशी शक्यता आहे, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला.

काही टेलिकॉम कपंण्याची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून उर्वरित सर्व टेलिकॉम कंपन्यांची इंटरनेट सेवा दुपारी दोनपर्यंत बंद होतील. 48 तासांसाठी इंटरनेतसेवा बंद राहणार आहे असे आयुक्त भारंबे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Saam TV Live