मुंबई, ठाण्यासह राज्यातील  रिक्षाचालक उद्यापासून संपावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांतील रिक्षाचालक उद्यापासून संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी, यांसारख्या अनेक मागण्या आहेत.

संघटनांनी राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या होत्या. आजही झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं रिक्षा चालक संपावर ठाम आहेत. 

या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

यामुळे उद्या मुंबईसह राज्यातील लाखो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. 

WebTitle : marathi news auto rickshaw drivers to go on strike against ola and uber

संबंधित बातम्या

Saam TV Live