रिक्षा-टॅक्सीच्या प्रवास भाडय़ात दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

रिक्षा-टॅक्सीच्या प्रवास भाडय़ात दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 10 ऑगस्ट रोजी मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण व राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी भाडे दरात प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ करण्याचा विचार केला जात आहे.

दोन वर्षांत सीएनजीचे दर प्रति किलो तीन रुपयांनी वाढले असून त्याचा विचार करता भाडय़ात वाढ करावी, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून वारंवार करण्यात येत आहे. ही मागणी पाहता प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ करण्याचा विचार केला जात आहे.

भाडेवाढ झाल्यास रिक्षाचे दीड किलोमीटपर्यंत असलेले 18 रुपये भाडे 20 रुपये आणि टॅक्सीचे 22 रुपये असलेले भाडे 24 रुपये होईल. त्यानंतरच्याही टप्प्यात वाढ होणार आहे. 

WebLink : marathi news auto taxi rate fare to increase in maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live