अवनी चतुर्वेदी ठरली फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट ठरली आहे. अवनी चतुर्वेदीने एकटीने मिग-21 बायसन उडवलं. अवनीने 19 फेब्रुवारी रोजी जामनगर एअर फोर्स स्टेशनवरुन टेकऑफ केलं. फायटर पायलट बनण्याकरता भारतीय महिला पायलटच्या पहिल्या बॅचमधील अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. जुलै 2016 मध्ये या तिघींचा फ्लाईंग ऑफिसर म्हणून समावेश करण्यात आला होता. भारताव्यतिरिक्त केवळ ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तानातच महिला फाइटर पायलट आहेत. देशात 1991 सालापासून महिला पायलट हेलिकॉप्टर आणि ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट उडवत आहेत.

फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट ठरली आहे. अवनी चतुर्वेदीने एकटीने मिग-21 बायसन उडवलं. अवनीने 19 फेब्रुवारी रोजी जामनगर एअर फोर्स स्टेशनवरुन टेकऑफ केलं. फायटर पायलट बनण्याकरता भारतीय महिला पायलटच्या पहिल्या बॅचमधील अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. जुलै 2016 मध्ये या तिघींचा फ्लाईंग ऑफिसर म्हणून समावेश करण्यात आला होता. भारताव्यतिरिक्त केवळ ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तानातच महिला फाइटर पायलट आहेत. देशात 1991 सालापासून महिला पायलट हेलिकॉप्टर आणि ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट उडवत आहेत. मात्र फायटर प्लेनपासून त्यांना दूरच ठेवण्यात येत होतं.


संबंधित बातम्या

Saam TV Live