देशभरात सरासरी 59.80 टक्के मतदान

देशभरात सरासरी 59.80 टक्के मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. या टप्प्यात देशातील 59 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून, 979 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. सहाव्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत सरासरी 59.80 टक्के मतदान झाले.

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले तर उत्तर प्रदेशात सर्वांत कमी 50.96 टक्के मतदान झाले. तसेच राजधानी दिल्लीत 55.44 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 60.12, हरियाणात 62.14 टक्के, बिहारमध्ये 55.04 टक्के, तर झारखंडमध्ये 64.46 टक्के मतदान झाले.  

मोदी सरकारमधील नरेंद्रसिंह तोमर (मुरैना, मध्य प्रदेश), मेनका गांधी (सुलतानपूर, उत्तर प्रदेश), राधामोहनसिंह (पश्‍चिम चंपारण्य, बिहार), डॉ. हर्ष वर्धन (चांदणी चौक, दिल्ली) या चार विद्यमान मंत्र्यांसह अनेक उमेदवारांना 23 मेनंतर जनतेचा कौल समजणार आहे.

Web Title: Average 59 percent voting in the country for Loksabha Election

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com