"मनसेच्या नव्या झेंड्यात राजमुद्रा टाळा" राज ठाकरेंना सुचना

"मनसेच्या नव्या झेंड्यात राजमुद्रा टाळा" राज ठाकरेंना सुचना

औरंगाबाद  : राज्यात नवीन समीकरणे पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच की काय राज ठाकरे हे आपल्या पक्षाचा ध्वज बदलत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून साकारलेल्या राजमुद्रेचा वापर करीत आहेत. त्यांनी हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होईल, असा इशारा आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिला आहे.

या अनुषंगाने श्री. ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात श्री. पाटील यांनी म्हटले, की आपल्या राजकीय वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, पक्षाचा ध्वज बदलत असताना त्यात राजमुद्रेचा वापर असल्याचे ऐकून दु:ख झाले. राजमुद्रेला एक अधिकृततेची झालर असते. ती त्या ठराविक राज्याची ओळख असते. त्यामुळे तिचा वापर करणे गैरकृत्य आहे. राजमुद्रा ही तमाम शिवप्रेमींचा आदर्श, प्रेरणादायी आहे. तिचा वापर कुठल्याही पक्षासाठी करणे म्हणजे स्वराज्याचा विचार मर्यादित करण्यासारखे होईल. राजमुद्रा ही एक विचार आहे, तिचे एक पावित्र्य असून तिचा कुठल्याही पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापर करणे म्हणजे दुर्दैवीच होईल. त्यामुळे हा प्रकार टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title - "avoid chatrapati shivaji maharaj seal party flag"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com