'आदित्य ठाकरेंमध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता' : संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

अयोध्या : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य संघटनेत अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांना संघटना चालविण्याचे अनुभव असून, राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित 18 खासदार उद्या (रविवार) अयोध्येत जाणार आहेत. या दौऱ्यात ते राम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीपूर्वी पहले मंदिर, फिर सरकार असे म्हटले होते. पण, आता केंद्रात एनडीएचे सरकार आल्याने राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागेल, अशी शिवसेनेला आशा आहे.

संजय राऊत म्हणाले, की उद्धव ठाकरे उद्या सकाळी नऊ वाजता अयोध्येत दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील. नरेंद्र मोदींसारखे खंबीर नेतृत्व केंद्रात असल्याने राम मंदिराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. सर्वांनाच राम मंदिर होईल याची खात्री आहे. आदित्य ठाकरे यांच्यात नेतृत्वगुण असून, ते राज्याचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. 

Web Title: Shivsena MP Sanjay Raut talked about Aditya Thackeray leadership

संबंधित बातम्या

Saam TV Live