असं असेल अयोध्येचं राम मंदिर...

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर आता सर्वांचंच लक्ष लागलंय ते मंदिराच्या निर्मितीकडे..कसं असेल अयोध्येतील श्रीरामाचं मंदिर?...मंदिरासाठी किती वेळ लागू शकतो? पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

 

अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर आता सर्वांचंच लक्ष लागलंय ते मंदिराच्या निर्मितीकडे..कसं असेल अयोध्येतील श्रीरामाचं मंदिर?...मंदिरासाठी किती वेळ लागू शकतो? पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

 

अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टानं सर्वसमावेशक निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय. मंदिराच्या निर्मितीसाठी खास आराखडाही तयार करण्यात आलाय. अयोध्येत मंदिराची प्रतिकृतीही साकारण्यात आलीय. 2.75 लाख घन मीटर परिसरातील राम मंदिर दोन मजली असेल.  त्यांची लांबी 270 मीटर,  रूंदी 140 फूट आणि उंची 128 फूट असेल.. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मिळून एकूण 212 खांब असतील. गाभारा, कौली, रंग मंडप, नृत्य मंडप और सिंहद्वार अशा पाच भागांमध्ये हे मंदिराची रचना असेल. रामजन्मभूमीच्या परिसरात पुरतत्व विभागानं खोदाई केल्यानं खुप सारे खड्डे आहेत. मंदिर निर्मितीवेळी हे सर्व खड्डे बुजवले जातील. त्याजागी कोरीवकाम केलेले दगड आणि खांबांच्या मदतीनं मंदिर उभारलं जाईल. मंदिरासाठी देशाच्या कानकोपऱ्यातून कोरीव दगड आणले जातील. यातील जयपुरी दगड हे खास असतील. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात ते थंडावा देतील तर थंडीच्या दिवसात उब देतील. मंदिरासाठी ट्रस्टची निर्मिती झाल्यानंतर मंदिर उभारणीसाठी किमान 5 वर्ष लागतील असा अंदाज आहे. 

Web Title - ayodhya's new ram temple 


संबंधित बातम्या

Saam TV Live